शनिवार, १ जुलै, २०१७

पहिला पाऊस

मेघ मल्हाराची धून
सये ओळखीची खुण

भेट आपुली स्मरते
धुके पांघरून विरते

चिंब चिंब पावसात
थेंब थेंब ओघळतात

पहिला पाऊस,
पहिल्या आठवणी
पाऊस गातो त्यांची गाणी

क्षणात सारे पालटले
मन पावसात गारठले

सोबतीला गार वारा
अंगावरती येतो शहारा

सये बिलगून धुक्यापरी
मंद झुळूक वाऱ्यावरी

पहिला पाऊस,
पहिल्या आठवणी
क्षण ओले चिंब पाणी पाणी

~किरण पड्याळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाऱ्याची हळुवार झुळूक साद देऊन जाते सख्याच्या स्पर्शाची हळूच याद देऊन जाते ~ किरण पडयाळ